डोळ्यातले पाणी , आडवाटेवर अडलंय
तरी तुझ्याच वाटेला, नजर लावून थांबलय ...
उपाशी पोटी , भूक हि हरपलीये
हवा फक्त मायेचा हात, त्याची पाठीवर थरथर
रोज रात्री , मी उठतो दचकून
निपचित अंधारात, तुझ्या खुणांनचीच संगत
मी चालतो अनवाणी , रस्ता हि मला कंटाळलाय
प्रत्येक वळणावर, होतात अता भास
लिहिता लिहिता , झाले कागद हि ओले
मनगटाची लाकडे ,चुलीला का अता काळीज जाळावे ?
आभासी विश्व , आभासी तू
तुज परी तूच , माय नाही दुसरा ईश्वर ...
अभिषेक खुर्द
११ oct २०१२
तरी तुझ्याच वाटेला, नजर लावून थांबलय ...
उपाशी पोटी , भूक हि हरपलीये
हवा फक्त मायेचा हात, त्याची पाठीवर थरथर
रोज रात्री , मी उठतो दचकून
निपचित अंधारात, तुझ्या खुणांनचीच संगत
मी चालतो अनवाणी , रस्ता हि मला कंटाळलाय
प्रत्येक वळणावर, होतात अता भास
लिहिता लिहिता , झाले कागद हि ओले
मनगटाची लाकडे ,चुलीला का अता काळीज जाळावे ?
आभासी विश्व , आभासी तू
तुज परी तूच , माय नाही दुसरा ईश्वर ...
अभिषेक खुर्द
११ oct २०१२

No comments:
Post a Comment